Thu, Apr 25, 2019 21:57होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडचा निकाल ९०.८७ टक्के

पिंपरी-चिंचवडचा निकाल ९०.८७ टक्के

Published On: May 31 2018 1:45AM | Last Updated: May 30 2018 11:34PMपिंपरी : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल आज बुधवार दि.30 रोजी जाहीर झाला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा निकाल 90.87 टक्के लागला आहे. 

21 फेब्रुवारी ते 10 मार्च 2018 या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. या वर्षी शहरातून 16 हजार 357 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये 8 हजार 937  मुले  व 7 हजार 420 मुली होत्या. यापैकी 7 हजार 846 मुले  व 7018 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.  यामध्ये मुलींचा निकाल 94.58 टक्के असून मुलांचा निकाल 87.79 टक्के आहे. राज्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील सोळा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 

16 महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल 

जयहिंद हायस्कूल पिंपरी, श्री स्वामी समर्थ कॉलेज भोसरी, के.जी.गुप्ता ज्युनिअर कॉलेज चिंचवड, निर्मल बेथानी हायस्कूल काळेवाडी, अमृता ज्युनिअर कॉलेज निगडी, सेंट उर्सुला ज्युनिअर कॉलेज आकुर्डी, कमलनयन बजाज चिंचवड, सरस्वती ज्युनिअर कॉलेज कुदळवाडी, हॉरिझॉन इंग्लिश मिडीयम स्कूल दिघी, सरस्वती विश्‍व विद्यालय ज्युनिअर कॉलेज निगडी, श्री स्वाती समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल भोसरी, क्रिएटीव्ह पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज निगडी, सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय रावेत, एस.बी.पाटील कॉलेज रावेत, युनिर्व्हसल ज्युनिअर कॉलेज बोर्‍हाडेवाडी, एस.एन.बी.पी कॉलेज रहाटणी.

मावळ तालुक्याचा निकाल 89.11 टक्के 

मावळ तालुक्याचा 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 89.11 टक्के लागला. परीक्षेस एकूण 3 हजार 975 विद्यार्थी बसले होते. एकूण 3 हजार 542 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 2166 मुले तर 1809 मुली होत्या. यामध्ये 1827 मुले व 1715 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचा निकाल 84.35 टक्के तर मुलींचा निकाल 94.80 टक्के इतका लागला.