होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड पालिकेचा लिपिक लाच घेताना जाळ्यात

पिंपरी-चिंचवड पालिकेचा लिपिक लाच घेताना जाळ्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे  ;  प्रतिनिधी 

विकत घेतलेला फ्लॅट पत्नीच्या नावे हस्तांतरित करून कर पावती करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी वाघिरे क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच रंगेहाथ पकडले.  अमोल चंद्रकांत वाघिरे, (वय 38, कनिष्ठ लिपिक, कर संकलन विभाग, पिंपरी वाघिरे क्षेत्रीय कार्यालय) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी 45 वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी फ्लॅट विकत घेतला होता. हा फ्लॅट पत्नीच्या नावे हस्तांतरण करून पत्नीचे नावे टॅक्स पावती करावयाची होती. त्यासाठी पिंपरी वाघिरे क्षेत्रीय कार्यालयातील करसंकलन विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ लिपिक अमोल वाघिरे याने त्यांना 2 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 
या तक्रारीची सोमवारी पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पिंपरी वाघिरे क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचला.

त्यानंतर वाघिरे याला कार्यालयातच 2 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कर्मचार्‍याने लाच मागितल्यास याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.
 

 

tags ; pune,news, Pimpri,Chinchwad, Corporation, clerk,bribe, Caught ,red ,handed,


  •