Wed, Nov 14, 2018 08:52होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड प्राधिकरण ‘पीएमआरडीए’त होणार विलीन 

पिंपरी-चिंचवड प्राधिकरण ‘पीएमआरडीए’त होणार विलीन 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीन करण्याचा निर्णय मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी (दि.26) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे प्राधिकरणाची सर्व मालमत्ता व जागा पीएमआरडीएकडे हस्तांतरीत केली जाणार आहे. मुंबईत झालेल्या या बैठकीत पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते, महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, आयुक्त श्रीकर परदेशी, मावळचे आमदार बाळा भेंगडे आदी उपस्थित होते. बैठकीत प्राधिकरणाचे पीएमआरडीएमध्ये विलिन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला. 

प्राधिकरणाच्या 43 चौरस मीटर क्षेत्रफळातील जागा आणि कार्यालय व सर्व मालमत्ता पीएमआरडीएकडे हस्तांतरीत केल्या जाणार आहेत. तसेच,  तेथील अधिकारी व कर्मचारी वर्गही त्यांच्याकडे वर्ग केला जाणार आहे. शिल्लक राहिलेला कर्मचारी वर्ग पिंपरी-चिंचवड पालिकेकडे वर्ग केला जाईल. या संदर्भात माहिती देताना महापौर काळजे यांनी सांगितले की, प्राधिकरण पीएमआरडीएकडे विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, रिंग रोड, पाणीपुरवठा आदी विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. 
 

 

 

tags ; Pimpri,news,Pimpri-Chinchwad Authority 'PMRDA Merge


  •