Wed, Mar 20, 2019 08:33होमपेज › Pune › भाजपच्या काळात उपेक्षित जातींवर अन्याय : सुशिलकुमार शिंदे

भाजपच्या काळात उपेक्षित जातींवर अन्याय : सुशिलकुमार शिंदे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी ; प्रतिनिधी 

भाजपच्या राजवटीत असहिष्णुता सुरू झाली असून, विविध उपेक्षित जातींवर अन्याय होत असल्याचे प्रतिपादन देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले. संत गुरू रविदास विचार समितीच्या वतीने देण्यात येणार्‍या विविध पुरस्कारांचे वितरण शिंदे यांच्या हस्ते प्राधिकरण येथील संत रोहिदास मंदिराच्या प्रांगणात झाले. त्या वेळी ते बोलत होते. पाली भाषेचे अभ्यासक अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांना ‘समाजभूषण’, तर सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळविलेले खासदार श्रीरंग बारणे यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नगरसेविका सुमन पवळे, माजी नगरसेवक तानाजी खाडे, शशिकिरण गवळी, जितेंद्र ननावरे, चर्मोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, कष्टकरी कामगार पंचायतीचे बाबा कांबळे, युवराज कोकाटे, दत्तात्रय कांबळे, समितीचे अध्यक्ष संतोष वाघमारे, रमेश साळवे, अरुण लोकरे, विनायक लोकरे आदी उपस्थित होते. या वेळी शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न यापूर्वी भाजप सरकारने केला होता.

आता पुन्हा देशात, राज्यात दलित आणि मागासवर्गीयांवर होणार्‍या अन्यायाकडे दुर्लक्ष करणारे हेच सरकार आहे. एकीकडे सामाजिक समतेच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे दलितांवर अन्याय करायचा, असा खेळ सरकारने मांडला आहे. देशात आंदोलनाचा भडका कधी उडेल सांगता येत नाही. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला या सरकारला धडा शिकवावा लागेल, असा इशाराही या वेळी शिंदे यांनी दिला.
 


  •