Tue, May 21, 2019 04:08होमपेज › Pune › सहा दिवसांत डेंग्यूचे ९ रुग्ण

सहा दिवसांत डेंग्यूचे ९ रुग्ण

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 12:16AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये डिसेंबर महिन्याच्या सहा दिवसांत डेंग्यूचे 76 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.  गेल्या तीन महिन्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या आणि इतर कीटकजन्य आजार ही चिंतेची बाब झाली होती. सध्याच्या आकडेवारीवरून डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसत आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये डेग्यूच्या रुग्णांची संख्या  शंभरावर झाली होती; तसेच मलेरिया व चिकुनगुनियाचे रुग्णही  वाढले होते. 

या महिन्यात आतापर्यंत 660 तापाच्या रुग्णांपैकी डेंग्यूचे 76 संशयित रुग्ण आढळले  आहेत. यापैकी नऊ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. सध्या आकडेवाडीवरून डेंग्यूचा धोका कमी असल्याचे चित्र असले, तरी थंडीच्या दिवसांत नियमित धूरफवारणी आणि औषधफवारणीही झाली नाही, तर कीटकजन्य आजारांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.