पिंपरी ःवातार्ताहर
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बारावीनंतच्या पदवी परीक्षेसाठी अर्थसाह्य दिले जाते. त्यानुसार एकूण 26 विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांप्रमाणे एकूण 6 लाख 50 हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाणार आहे. पालिकेच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षेसारख्या उच्चशिक्षणासाठी दरवर्षी अर्थसाह्य केले जाते. सन 2017-18 मध्ये या योजनेसाठी 67 अर्ज प्राप्त झाले. अर्जांची तपासणीनंतर त्यांतील 36 अर्ज पात्र ठरले. सदर लाभार्थींना 25 हजार रुपयांप्रमाणे 6 लाख 50 हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या योजनेसाठी सन 2017-18 आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात एकूण 60 लाख रुपये इतकी तरतूद केलेली आहे. त्या निधीतून हा खर्च केला जाणार आहे. सदर खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि.13) होणार्या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.