Thu, Jul 18, 2019 02:36होमपेज › Pune › ७५० मालमत्ता सांभाळण्यासाठी १ हजार १८१ सुरक्षारक्षक 

७५० मालमत्ता सांभाळण्यासाठी १ हजार १८१ सुरक्षारक्षक 

Published On: Dec 20 2017 2:38AM | Last Updated: Dec 20 2017 2:18AM

बुकमार्क करा

पिंपरी ः प्रतिनिधी 

महापालिकेच्या शहरात विविध ठिकाणी अशा एकूण 750 मालमत्ता आहेत. त्यांची सुरक्षा करण्यासाठी पालिका कंत्राटी पद्धतीने एकूण 1 हजार 181 सुरक्षारक्षक, मदतनीस नेमणार आहे. त्यासाठी 17 कोटी 14 लाख 72 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. 

पालिकेचे पिंपरी-चिंचवड भवन, आठ क्षेत्रीय कार्यालये, 16 करसंकलन कार्यालये, प्रेक्षागृहे, उद्याने, भाजी मंडई, पाण्याचा टाक्या, दवाखाने, प्राथमिक व माध्यमिक शाळा आदी अशा एकूण 750 मालमत्ता आहेत. या मालमत्तेच्या 24 तास सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमले जातात. जुन्या ठेकेदारांना वेळोवेळी मुदतवाढ दिल्यानंतर अखेर नव्याने ठेकेदार नेमण्यासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार आता 1 हजार 181 सुरक्षारक्षक व मदतनीस नेमले जाणार आहेत. 

संबंधित ठेकेदारांची मुदत 1 जानेवारी 2017 ला संपल्यानंतर वेळोवेळी प्रत्येकी तीन महिन्यांची 3 वेळा मुदतवाढ दिली गेली. मुदतवाढीबाबत टीका होऊ लागल्याने,  पालिकेने 648 नवीन मदतनीसांची  नेमणूकीसाठी निविदा प्रक्रिया राबवली. सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त 45 कर्मचारी, नवी सांगवीतील निळूभाऊ फुले नाट्यगृह येथे 15 मदतनीस, काळेवाडी व फुगेवाडी भुयारी मार्गासाठी 7 मदतनीस असे जादा 67 कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. अशा एकूण 715 मदतनीस यांच्या ठेक्यासाठी 17 कोटी 14 लाख 72 हजार रुपये खर्च येईल. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या 24 इमारतींच्या 24 तास संरक्षणासाठी 294 रखवालदार नेमले जाणार आहेत; तसेच सहा शाळांवर 22 जादा कर्मचारी आवश्यक आहेत. एकूण 316 रखवादार नेमले जातील. सदर सुरक्षारक्षक, मदतनीस नेमण्याच्या खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि.20) होणार्‍या स्थायीसमोर आहे.