Thu, Aug 22, 2019 10:13होमपेज › Pune › थेरागावात एटीएममधून  १० लाख केले लंपास

थेरागावात एटीएममधून  १० लाख केले लंपास

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:05AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

एटीएम सेंटरमधील सीपीयू चोरून त्याद्वारे 10 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना दोन महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. हा प्रकार बँक ऑफ महाराष्ट्रच्या थेरगाव एटीएम सेंटरमध्ये घडला.  सचिन काळगे (30, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्रच्या थेरगाव फाटा येथे एटीएम सेंटरयमध्नू  दि. 7 ऑक्टोबरला सायंकाळी 5 पर्यंत एटीएममधून कोणतेच ट्रॅन्झॅक्शन होत नसल्याचे बँक अधिकार्‍यांना समजले. त्यानंतर संबंधित एटीमएमची अधिकार्‍यांनी पाहणी केला असता तेथील सीपीयू गायब झाल्याचे आढळून आले.

बँकेने 25 ऑक्टोबरपर्यंत याचा टेक्निकल तपास केला. नवीन सीपीयू बसवून एटीएम सेंटर सुरू केले; पण नेमकी किती रोकड येथून लंपास झाली हे समजण्यास बँकेला तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला असून दि. 22 डिसेंबरला पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.  सीपीयू काढून चोरीचा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. सीपीयू काढल्यावर मशिनमधून व्यवहार झालेच कसे, हा देखील संशयास्पद प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.