होमपेज › Pune › ‘पिफ’मध्ये ‘पिंपळ’ने कोरले नाव

‘पिफ’मध्ये ‘पिंपळ’ने कोरले नाव

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:41AMपुणे : प्रतिनिधी

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पिंपळ’ या चित्रपटाने उत्कृष्ट मराठी चित्रपटाचे पारितोषिक मिळवत संत तुकाराम पुरस्कारावर आपले नाव कोरले. त्यासोबतच, पिंपळ याच चित्रपटाच्या गजेंद्र अहिरे यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक प्राप्त केले. तसेच, राज्य शासनातर्फे दिला जाणारा प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार चीनच्या ‘फ्री ऍन्ड इझी’ या चित्रपटाने मानकरी ठरला. उत्कृष्ट सिनेमेटोग्राफर, उत्कृष्ट बालकलाकार व प्रेक्षकांचा आवडीचा चित्रपट म्हणून ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाने पारितोषिकांची लूट केली.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (पिफ)चा समारोप सोहळा पार पडला. यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे मुख्य सचिव नितीन गद्रे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, महोत्सवाचे परीक्षक मॉरिझिओ निशेती, ज्यूरी विमुक्ती जयासुंदरा, गेलारेह अब्बासी, रॉड्रीगो प्ला, मॅथ्यू डेनिस उपस्थित होते. 

‘प्रभात पुरस्कार’ चीनच्या ‘फ्री अँड इझी’ या चित्रपटाने पटकावला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा ‘संत तुकाराम पुरस्कार’ ‘पिंपळ’ या चित्रपटाने पटकाविला. उत्कृष्ट बालकलाकार रमण देवकर, मिताली जगतापला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार दिला.