Fri, Feb 22, 2019 09:33होमपेज › Pune › पिंपरी-चिंचवड पालिकेत शिवसेनेने सोडले डुक्‍कर

पिंपरी-चिंचवड पालिकेत शिवसेनेने सोडले डुक्‍कर

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 03 2018 3:30PMपिंपरी: प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात मोठया संख्येने डुक्कर वाढली आहेत. त्याचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत शिवसेना नगरसेवक ॲड सचिन भोसले यांनी मंगळवारी पालिका भवनात डुक्कर सोडले.
पालिकेतील दुसऱ्या मजल्यावरील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . अनिल रॉय यांचा टेबलवर नगरसेवक व कार्यकर्त्यांनी डुक्कर ठेवले. तक्रार करूनही डुक्करांचा बंदोबस्त का केला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कार्यालयात डुक्कर पाहून अधिकारी व कर्मचारी आशचर्यचकीत झाले.