Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Pune › पालखी मार्गावरील जमिनीचे पंचनामे बंद पाडले

पालखी मार्गावरील जमिनीचे पंचनामे बंद पाडले

Published On: Aug 21 2018 1:39PM | Last Updated: Aug 21 2018 1:39PMउंचवडी (बारामती) : पुढारी ऑनलाईन

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील जमिनीचे पंचनामे शेतकऱ्यांनी बंद पाडले. आज सकाळी खराडेवाडी (ता. बारामती) येथे जमिनीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला. जोपर्यंत जमिनीचा दर निश्चित होणार नाही तोपर्यंत पंचनामा करु देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

खराडेवाडी येथून बारामती ते पाटसला जाणाऱ्या रस्त्यावरील किती शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार याचा पंचनामा करण्यासाठी अधिकारी आले होते. गुजखीळा येथील शेतकऱ्यांच्या विहिरी, घरे, दुकाने, फळझाडे यांचा पंचनामा ते करणार होते. मात्र, जमिनीचा गुंठ्याला किती दर, तसेच घराला किती दर हे निश्चित नसल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामा करण्यास विरोध केला. जोपर्यंत गुंठ्याचा दर निश्चित होत नाही तो पर्यंत जागेचा पंचनामा होऊ न देण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी संबंधीत पदाधिका-यांना दिला.