Wed, Apr 24, 2019 20:15होमपेज › Pune › दहा वर्षात अवघ्या ३०० ‘मोबाईल’ ड्रायव्हरांना ठोठावला दंड 

दहा वर्षात अवघ्या ३०० ‘मोबाईल’ ड्रायव्हरांना ठोठावला दंड 

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 1:38AMपुणे : शिवाजी शिंदे 

वाहन चालविताना अपघात झाल्याच्या हजारो घटना समोर असताना, पीएमपीचे बसचालक यातून कोणत्याही प्रकारचा बोध घेत नसल्याचे गेल्या दहा वषार्र्ंत प्रशासनाने केलेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, या कारवाईत गेल्या दहा वषार्र्ंत केवळ तीनशे चालकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला आहे. त्यामुळे बसचालकांबरोबरच प्रशासनानेही या मोहिमेबद्दल फारसे गांभीर्य पाळल्याचे दिसत नाही. 

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुबराव पाटील यांच्या संकल्पनेतून सन 2008 मध्ये बसचालकांना शिस्त लागावी, त्यांनी बस चालवित असताना मोबाईलवर बोलू नये, यासाठी संबंधित बसचालकाचे छायाचित्र काढून प्रवाशाने प्रशासनाकडे सुपूर्द केल्यास अथवा ई-मेल केल्यास, त्या प्रवाशाला एक हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अर्थात हे बक्षीस मोबाईलवर बोलणार्‍या चालकास दंड ठोठावून आणि त्यांच्या वेतनामधून कपात करून संबंधित प्रवाशाला ते बक्षीस देण्यात येत होते. त्यानुसार कारवाई करण्यातही आली; मात्र मागील दहा वषार्र्ंत केवळ तीनशे चालकांवर दंडात्मक कारवाई झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्यापोटी प्रवाशांना बक्षीस म्हणून सुमारे तीन लाख रुपये देण्यात आल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

छायाचित्र काढण्याची प्रक्रिया थंडावणार 

गेल्या दहा वषार्र्ंपासून बस चालवित असताना मोबाईलवर चालकाचे छायाचित्र प्रवाशाने स्वत:च्या मोबाईलवर काढून ते ई-मेल अथवा प्रत्यक्षात प्रशासनाकडे सुपूर्द केल्यास त्यांना बक्षीस देण्यात येत होते. आता मात्र प्रवाशांना बक्षीस देण्याची योजना पीएमपी प्रशासनाने बंद केली आहे. त्याऐवजी दंड ठोठाविण्यात येणारी एक हजार रुपयांची रक्कम आता प्रवाशांना न देता ती कामगार कल्याण निधीत जमा करण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबिले आहे. त्यामुळे प्रवासी बसचालकाचे मोबाईलवर बोलत असतानाचे छायाचित्रे काढणार नाहीत आणि परिणामी ही योजना अप्रत्यक्षरित्या प्रशासनाकडून गुंडाळली जाणार, असेच सकृतदर्शनी दिसून येत आहे.

बक्षीस घेण्यात एकाच प्रवाशांची अनेकवेळा नावे

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष सुबराव पाटील यांनी बसचालकांना चाप बसावा यासाठी ही दंडात्मक कारवाई करण्याचे नामी शक्कल लढविली होती. मात्र या उपक्रमाचा काही प्रवाशांनी अक्षरक्ष: रोजीरोटी कमविण्याचे साधन बनविले होते. काही ठराविक मार्गावर तेच-तेच प्रवासी मोबाईलवर बोलत असलेल्या बस चालकांचे छायाचित्रे काढत होते. आणि या योजनेतील बक्षीसानुसार त्यांना एक हजार रूपयांचे बक्षीस द्यावेच लागत होते. त्याचाच गैरफायदा काही प्रवाशांनी घेऊन, या उपक्रमाचा धंदाच केला होता. त्यामुळे की काय बक्षीसाची रक्कम आता कामगार कल्याण निधीत जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे.

 

Tags : pune, pune news, Driving, mobile drivers, Penalties,