Mon, Aug 19, 2019 07:51होमपेज › Pune › नको ते साहस पडतेय महागात

नको ते साहस पडतेय महागात

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 12 2018 10:37PM

बुकमार्क करा
पवनानगगर : रवि ठाकर 

लोणावळा-खंडाळा या प्रसिध्द थंड हवेच्या ठिकाणी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो पर्यटक येत असतात. यामुळे जवळच असलेल्या पवनानगर परिसरातील निसर्ग रम्य ठिकाणीही पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिसरात पवना धरण, श्रीक्षेञ दुधिवरे(प्रति पंढरपूर), ऐतिहासिक तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर ही ठिकाणे असून पर्यटकांची त्याला मोठी पसंती मिळत आहे. मात्र, याठिकाणी येणारे अनेक पर्यटक मौज मजेच्या नादात नको ते साहस करून स्वतःचा जीव धोक्यात घालून घेत असल्याचेही चित्र सध्या दिसून येत आहे. या पर्यटकांनी तारतम्य बाळगून आपली सहल आनंददायी करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनासह ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

अनेक पर्यटक शनिवार, रविवार वगळून इतर दिवशीही पिकनिकसाठी याठिकाणी येतात. यामुळे या परिसरात केवळ सुट्टीच्या दिवशीच गर्दी पहायला मिळते असे नाही तर इतर दिवशीही पर्यटक येत असतात. पर्यटकांमुळे येथील हॉटेल व्यावसायाला चालना मिळाली आहे. धरण परिसरात पर्यटकांची संख्या जास्त असते. पावसाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी छोटे-मोठ्या पॉईंटजवळ उभे  राहून सेल्फी काढण्यासाठी काही पर्यटक स्वतःचा जीव धोक्यात घालायला मागे पुढे पाहत नाही. पर्यटकांची संख्या जास्त असल्याने त्यावर नियंञण ठेवणे शक्य होत नाही; परंतु पर्यटकांनी स्वतःच भान ठेवणे गरजेचे आहे.  

मिञांसोबत मद्यपान करुन गाडीतील टेप लावून रस्त्याच्याकडेला काही बेशिस्त पर्यटक धिंगाना घालत असतात. यामुळे वाहनचालकांसोबत वादाच्याही काही घटना घडत आहेत.  या सार्‍या प्रकारास बेशिस्त पर्यटक जबाबदार आहेत.  पवना धरणात आतापर्यत पाण्यात बुडुन 30 जणांनी आपला जीव गमावला आहे. अनेक पर्यटक पर्यटनाबरोबरच मद्यपान करुन पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करतात. यात पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गमावल्याच्या घटनाही घडल्या आहेत.  पर्यटकांनी भान ठेवणेही गरजेचे आहे. रविवारी पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करणार्‍या 9 मित्रांचा ग्रुप एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. फोटो काढण्यासाठी गेले असताना दुर्दैवी घटना घडली. यात दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.