Fri, May 24, 2019 09:24होमपेज › Pune › सातत्य टिकविण्याची आता मोठी जबाबदारी

पवन शहा 19 वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार

Published On: Aug 30 2018 1:58AM | Last Updated: Aug 30 2018 1:34AMपिंपरी ः प्रतिनिधी

निवडसमितीने विश्‍वासाने टाकलेली कर्णधारपदाची जबाबदारी माझ्यासाठी मोठे ‘सरप्राईज’ आहे, मात्र त्यामुळे आता कामगिरीतील सातत्य राखण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर असेल, असे भारतीय अ संघाच्या चौरंगी मालिकेसाठी आणि 19 वर्षांखालील आशियायी करंडक स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड झालेल्या पवन शहा याने सांगितले. 

श्रीलंकेला गेलेल्या 19 वर्षांखालील भारतीय संघाने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका मोठ्या फरकाने जिंकली. या मालिकेत पवन शहा याच्या कामगिरीने सार्‍यांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या या कामगिरीच्या पार्श्‍वभूमीवरच त्याला कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, या जबाबदारीमुळे आता संघाच्या कामगिरीची जबाबदारीही आपली असल्याचे पवन सांगतो.

खेळातील सातत्य टिकविण्याची जबाबादारी माझ्यावर आहेच, पण यापुढे पूर्ण संघाची जबाबदारी असल्याने पूर्ण संघ मला पुढे घेऊन जायचा आहे. मी त्यासाठी निश्‍चित प्रयत्न करुन संघाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे तो म्हणाला. आपल्या यशाचे श्रेय तो माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर आणि पुण्यातील स्थानिक प्रशिक्षकांना देतो.

पवन शहा 19 वर्षांखालील भारतीय संघाचा कर्णधार

चौरंगी क्रिकेट मालिका आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय निवड समितीने , 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या कर्णधारपदी आकुर्डी, पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा तडाखेबाज फलंदाज पवन शहा याची निवड बुधवारी (दि.29) निवड समितीने जाहीर केली आहे. या निवडीमुळे पवन शहावर क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

श्रीलंका येथे नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील भारत आणि श्रीलंका दरम्यानची कसोटी मालिका भारतीय संघाने (2-0) अशी जिंकली होती. या मालिकेत पवनने धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन करताना धावांचा डोंगर उभा केला. त्याने केलेली 332 चेंडूतील 282 धावांची खेळी महत्वपूर्ण ठरली. 

कसोटी मालिकेनंतर झालेली एक दिवसीय मालिकाही भारताने  3-2 अशा फरकाने जिंकली. पवनला कसोटी मालिकेत ‘मॅन ऑफ दी सीरिज’ आणि  एकदिवसीय मालिकेचा ‘बेस्ट बॅटसमन’ म्हणून सन्मानित करण्यात आले होते. पवनच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे निवड समितीने आगामी चौरंगी क्रिकेट मालिकेसाठी भारत अ संघाचा आणि आशिया चषक स्पर्धेसाठी 19 वर्षांखालील भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड जाहीर केली आहे. 

पवन वयाच्या आठव्या वर्षापासून क्रिकेट खळतो आहे. तेव्हापसून त्याने व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमी जॉईन केली होती. त्याला भारतीय संघाचे माजी कर्णधार दीलिप वेंगसरकर,  मोहन जाधव, विजय पाटील, शादाब शेख, चंदन गंगावणे, भूषण सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. 

19 वर्षांखालील भारतीय ‘अ’ संघ पुढील प्रमाणे- पवन शहा (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, यशस्वी जैयस्वाल, अनुज रावत (यष्टीरक्षक), प्रब सिमरन सिंग (यष्टीरक्षक), यश राठोड, आयुष बदोनी, नेहाल वढेरा, सिद्धार्थ देसाई, हर्ष त्यागी, अजय देव गौड, यतिन मंगवाणी, मोहित जागंरा, समीर चौधरी, राजेश मोहंती. 

‘ब’ संघ- वेदांत मुरकर (कर्णधार/यष्टीरक्षक), ठाकूर तिलक वर्मा, कमरान इक्बाल, वमसी कृष्णा, प्रदोष रंजन पॉल, ॠषभ चौहान, सिद्धांत राणा, सयान कुमार बिश्वास (यष्टीरक्षक), शुभांग हेगडे, रिझवी समीर, पंकज यादव, आकाश सिंग, अशोक संधू, आयुष सिंग, नितीश रेड्उी, साबीर खान, साहिल राज, राजवर्धन हंगरगेकर.