Sat, Jul 20, 2019 12:59होमपेज › Pune › पुन्हा पेटणार ‘पवने’चे पाणी

पुन्हा पेटणार ‘पवने’चे पाणी

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:20AMपवनानगर  : वार्ताहर 

पवना धरण प्रकल्पातील उर्वरित बाधितांना आजतागायत जमिनी न मिळाल्याने 26 फ्रेबुवारी रोजी पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मकुंदराज काऊर व सचिव दत्तात्रय ठाकर, कार्याध्यक्ष नारायण बोडके, संचालक ज्ञानेश्वर गोणते यांनी दिली आहे.

पवना धरणाचे काम 1965 मध्ये सुरू होऊन 1973 मध्ये पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पासाठी 19 गावातील 2 हजार 394 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले. या प्रकल्पामुळे 1 हजार 203 शेतकरी बाधित झाले.  त्यापैकी 340 प्रकल्पग्रस्तांना मावळ व खेड या भागात जमिनीचे वाटप करण्यात आले. उर्वरित 863 प्रकल्पग्रस्त व दोनशे बाधित ज्यांचे अजूनही संकलीत यादीत नावे नाही, असे एकूण 1063 खातेदारांना अद्याप जमिनींचे वाटप करण्यात आलेले नाही.  

या उर्वरित प्रकल्पबाधितांना जमिनी मिळाव्या व इतर मागण्यांसाठी धरणग्रस्त गेल्या 45 वर्षांपासून लढा देत आहेत; तसेच महापालिकेने 19 गावे दत्तक घेऊन रस्ते,आरोग्य, शिक्षण व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोक़र्‍या तसेच गाळे देण्याचे आश्वासन दिले होते. याचीही पुर्तता अद्याप झालेली नाही. याबाबत पवना धरणग्रस्त कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली. ज्याप्रमाणे 340 खातेदारांचे पुर्नवसन केले,  त्याचप्रमाणे उर्वरित खातेदारांना वाटप करण्यात यावे असे आदेश उच्च न्यायलयाने संबंधितांना दिले आहेत. पवना धरणग्रस्तांचे पुर्नवसन करण्यासाठी गेल्यावर्षी विधानसभेत शेती महामंडाळातील जमीन वर्ग करण्याबाबतचा ठरावही करण्यात आला होता; परंतु त्याकडे शासन जाणूनबोजून दुर्लक्ष करत असल्याचे धरणग्रस्त कृती समितीचे म्हणणे आहे. 

त्याचप्रमाणे पवना धरणासाठी जमीन संपादन करताना शेतकर्‍यांना विश्वासात न घेता महत्तम पूर पातळीच्या बाहेरील 1426 एकर अतिरिक्त जमीन संपादित करून शेतकर्‍यांची फसवणूक केलेली आहे. याबाबतचे लेखी पत्र मुख्यमंत्री, महससूल व पुनर्वसन मंत्री, जलसंपदामंत्री, विरोधी पक्ष नेते, मावळचे खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच पिंपरी-चिचंवड पालिकेचे आयुक्त, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, पोलिस निरीक्षक लोणावळा ग्रामिण पोलिस स्टेशनला देण्यात आले आहेत.