Mon, May 20, 2019 20:16होमपेज › Pune › ‘पवना’ ७० टक्के भरले

‘पवना’ ७० टक्के भरले

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 17 2018 1:09AMपवनानगर : वार्ताहर 

मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडची तहाण भागवणार्‍या पनवा धरण परिसरात गेल्या चोवीस तासांपासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून, धरण 69.37 टक्के भरले आहे.  पवना धरण परिसरात बारा तासांत 135 मिलीमीटर पावासाची नोंद झाली आहे. तर परिसरात एक जूनपासून 1686 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. धरणाची पातळी 2007 फूट एवढी झाल्याची  माहिती धरणाचे शाखाधिकारी ए. एम. गदवाल यांनी दिली 

गेल्या दोन आठवड्यापासून पडत असलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे, नाले, ओहळा भरून वाहत असल्याने पवनानदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.  त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती प्राप्त झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडवली होती.  तसेच परिसरातील  चाळीसगावची बाजारपेठ असलेल्या पवनानगर चौकामध्ये तुरळक गर्दी दिसत होती.  शेतामंध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने  शेतकर्‍यांनी भातलावणीचे काम बंद करणे पसंत केले.  गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत धरणात फक्त 59 टक्के पाणीसाठा झाला होता.