Sat, Apr 20, 2019 23:51होमपेज › Pune › प्रवाशांनी रिक्षा जबरदस्तीने चोरली

प्रवाशांनी रिक्षा जबरदस्तीने चोरली

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 25 2017 12:03AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

प्रवासी म्हणून बसलेल्या तिघांनी रिक्षा चालकास दमदाटी करून त्याच्याकडील 200 रुपये आणि रिक्षा जबरदस्तीने काढून धूम ठोकली. हा प्रकार आकुर्डी रेल्वे स्थानक ते खडकी रेल्वे स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास घडला. चोरट्यांनी एक लाख 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

प्रकाश कदम (47, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हे शनिवारी रात्री त्यांची रिक्षा घेऊन आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी तीन अज्ञात इसम रिक्षामध्ये बसले. त्यांनी पिंपरी येथे जायचे असल्याचे सांगितले. कदम प्रवाशांना घेऊन पिंपरी येथे गेले असता प्रवाशांनी आमच्याजवळ पैसे नसल्याचे सांगितले. 

या तिघांनी कदम यांचा फोन घेऊन मित्राला फोन केला व खडकी येथे पैसे देतो तिकडे चला, असे म्हणून त्यांना खडकी रेल्वे स्थानकावर नेले. त्या ठिकाणी या तिघांनी कदम यांना दमदाटी करत यांच्या खिशातील 200 रुपये काढून घेतले व त्यांना रिक्षातून खाली उतरवून रिक्षा घेऊन पसार झाले.