Thu, Feb 21, 2019 07:05होमपेज › Pune › प्रवाशांना भीम अ‍ॅप वापरून तिकीट काढता येणार 

प्रवाशांना भीम अ‍ॅप वापरून तिकीट काढता येणार 

Published On: Dec 06 2017 3:27PM | Last Updated: Dec 06 2017 3:27PM

बुकमार्क करा

पुणे: प्रतिनिधी 

रेल्वे प्रवाशांना भीम अ‍ॅपचा (भारत इंटरफेस फॉर मनी) वापर करून तिकीट काढता येणार आहे. १ डिसेंबर पासून अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे. भीम अ‍ॅपद्वारे पैसे भरून तिकीट आरक्षित करता येणार आहे. कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, प्रवाशांच्या पसंतीस हे अ‍ॅप उतरल्याचे दिसून येत आहे. 

नोव्हेंबर २०१६ पूर्वी कॅशलेसद्वारे देशभरात आरक्षित रेल्वे तिकीट काढणार्‍यांची संख्या ५८ टक्के एवढी होती. नोव्हेंबर २०१६ नंतर हेच प्रमाण ७० टक्के एवढे झाले. पुणे विभागात देखील कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी ठिकठिकाणी डेबिट व क्रेडिट कार्ड स्वीकारणारी पीओएस मशिन बसविण्यात आली. आता भीम अ‍ॅपमुळे प्रवाशांना अधिक सोयीचे होणार असून, चुटकीसरशी पैसे ट्रान्स्फर करून तिकीट काढता येणे सहज शक्य होणार आहे. 

दरम्यान, पुणे विभागात देखील या उपक्रमास सुरूवात झाली असून, पुणे स्टेशन, शंकरशेठ रोड आरक्षण केंद्र, डेक्कन आरक्षण केंद्रासह अन्यही ठिकाणी भीम अ‍ॅपचा वापर करून तिकीट आरक्षित करता येणार आहे. दर महिन्याला देशभरातून पाच भाग्यवंत प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे.   


भीम अ‍ॅप कसे वापरावे?  
आरक्षित व अनारक्षित तिकीट खिडक्यांवर भीम अ‍ॅप वापरून पैसे ट्रान्सफर करण्याआगोदर प्रवाशांना प्रवास तपशील द्यावा लागणार.

-प्रवाशांकडून पुढील तीन महिन्यांसाठी नव्या तिकीट काढण्यावर देवाण-घेवाण शुल्क आकारले जाणार नाही.  

-रेल्वे आरक्षण केंद्रावर भीम अ‍ॅप वापरून तिकीट आरक्षित केल्यावर आरक्षण केंद्रातील कर्मचारी तिकीट शुल्क आकारण्यासाठी बँकेचे तपशील भरून घेतील.  

-प्रवाशाला पेमेंट करण्यासंदर्भात मोबाइलवर विनंती येईल व त्याने ती स्वीकारल्यानंतर लिंक केलेल्या खात्यातून भाड्याची रक्कम वजा केली जाईल. 

-प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या सिस्टिमवर ते तपासले जाईल व कर्मचारी त्या तिकिटाची प्रत काढून प्रवाशाला देतील. 

-भीम अ‍ॅपद्वारे विविध बँकेच्या खात्यातून पेमेंट करता येईल.

-या प्रक्रियेद्वारे कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन मिळेल, त्याचप्रमाणे प्रवाशांना त्यांचे डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्याचा क्रमांक पुरवण्याची देखील आवश्यकता नाही