Tue, Apr 23, 2019 05:35होमपेज › Pune › महाराष्ट्र दिनी महाश्रमदानात सहभाग घ्या : आमिर खान

‘महाराष्ट्र दिनी महाश्रमदानात सहभाग घ्या’

Published On: Apr 20 2018 12:25PM | Last Updated: Apr 20 2018 12:25PM
पुणे : प्रतिनिधी

पाणी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त ’महाश्रमदान’ चे आयोजन करण्यात आले आहे. वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावात हे महाश्रमदान होणार आहे. यामाध्यातून महाविद्यालयीन तरूणांनी या महाश्रमादानात सहभाग नोंदवावा, जलमित्र बनून यात सहभागी होण्याची संधी शहरी युवकांना यातून मिळणार आहे. राज्यातील सर्वच तरूणांनी यामध्ये सहभाग घेऊन दुष्काळावर मात करण्याचे अवाहन अभिनेता आमिर खानने केले आहे.

पुण्यातील सिंबायोसिस महाविद्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत (शुक्रवार दि.२० एप्रिल) आमिर खान बोलत होता. या वेळी तो म्हणाला, या योजनेत सहभागी होण्यासाठी जलमित्रच्या वेबसाईटवर रजिस्टर करून कोणीही जलमित्र होऊ शकतो. रजिस्ट्रेशन करून महाश्रमदान योजनेत सहभागी होता येणार आहे. २२ मार्च २०१८ या जागतिक जलदिनी जलमित्र या योजनेची घोषणा करण्यात आली होती. केवळ तीन आठवड्यात एक लाखांहून जास्त जणांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी साईन अप केले आहे. शहरी भागातील तरुणांना गावातील नागरिकांना मदत करून त्यांच्याशी जोडून घेण्याची ही संधी आहे. यामध्ये जास्तीजास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन आमिर खानने केले आहे.