पिंपरी : प्रतिनिधी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई)चे पेपर फुटल्याने दहावीचा गणित व बारावीचा अर्थशास्त्र या दोन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या या निर्णयाने शहरातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, या निर्णयाने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या ठिकाणी पेपर फुटला त्या ठिकाणीच परीक्षा घ्या, आम्हाला मनस्ताप का; तसेच पेपर लीक झाला त्यात मुलांचा काय दोष, असा सवाल पालक करीत आहेत. या निर्णयामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, या विषयांची फेरपरीक्षा घेऊ नये, अशी अपेक्षा पालकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे.
सीबीएसईच्या निर्णयाचा शहरातील पालक व विद्यार्थ्यांनी विरोध केला असून, ज्या ठिकाणी पेपर लीक झाला, तेवढ्याच विभागाची परीक्षा घ्या, इतर मुलांना वेठीस का धरले जात आहे; तसेच प्रश्नपत्रिका फुटली त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. बोर्डाचा असाच अनागोंदी कारभार असेल, तर सीबीएसई बोर्डावर विश्वास कसा ठेवायचा, अशा भाषेत प्रतिक्रिया व्यक्त करून एकूणच सीबीएसई बोर्डाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उठवले आहे.
Tags : Pune Pimpri, Pimpri News, Parents, students, angry, CBSE, decision
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM