Thu, Feb 21, 2019 21:20होमपेज › Pune › आई-वडिलांचे भांडण; पोलिसांकडून मुलांचा सांभाळ 

आई-वडिलांचे भांडण; पोलिसांकडून मुलांचा सांभाळ 

Published On: Feb 03 2018 2:16AM | Last Updated: Feb 03 2018 10:31AMपिंपरी : प्रतिनिधी

आई-वडिलांच्या भांडणात दोन मुलांचा सांभाळ न करता त्यांना सोडून देणार्‍या पालकांना निगडी पोलिसांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. या पालकांवर गुन्हा दाखल करत अटक करून न्यायाधीशांसमोर उभे केले. न्यायाधीशांनी वडिलांना जामीन मंजूर केला आहे. 

राजेश जयसिंग भोसले (39, आकुर्डी) आणि प्रतिभा राजेश भोसले (34 यमुनानगर) अशी या आई आणि वडिलांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड मधील राहणार्‍या प्रतिभा आणि राजेश यांच्या विवाहानंतर समृद्धी राजेश भोसले (वय 10 वर्षे) आणि एक 4 ते 5 वर्षांचा मुलगा अशी दोन अपत्ये त्यांना झाली. त्यानंतर समृद्धीला सांभाळण्याची दोघांची तयारी नसल्याने आणि घरातील खासगी भांडणामुळे मुलीचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आई आणि वडिलांनी मुलीची देखभाल करणार नाही म्हणत स्टेशन येथे सोडून गेले आहे. त्यानंतर तीन दिवसांपासून निगडी पोलिसदेखील या आई-वडिलांना समजावून बेजार झाले आहेत. अटक केलेल्या दोघांना मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी न्यायाधीशांनी मुलांचा सांभाळ कोण करणार असे विचारले. या वेळी आईने हात झटकले, तर वडिलांनी जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे वडिलांना जामीन मंजूर झाला.  तसेच दर रविवारी निगडी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले. वडिलांनी नंतर मुलांचा सांभाळ न केल्यास तसा अहवाल पाठवण्याचे पोलिसांना सांगितले. गेले तीन दिवस निगडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी विजय पळसुले, शंकर अवताडे आणि इतरांनी त्यांचा सांभाळ केला.