Wed, Jan 16, 2019 22:32होमपेज › Pune › ‘एमआयटी’तूनच केला पेपर व्हायरल

‘एमआयटी’तूनच केला पेपर व्हायरल

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 27 2018 1:00AMपुणे : प्रतिनिधी 

सोशल मीडियावर बुधवारी व्हायरल झालेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी प्रथम वर्षाचा इंजिनिअरिंग मॅकेनिक्सचा पेपर एमआयटी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रातूनच व्हायरल केल्याची कबुली ?एमआयटी?च्याच आदर्श रवींद्रन या विद्यार्थ्याने शनिवारी विद्यापीठाच्या चौकशी पथकासमोर दिली. त्यांतर ‘एमआयटी’ने दिलेल्या तक्रारीनुसार त्यास कोथरुड पोलिसांनी ताब्यात घेतले. 

रवींद्रन मूळचा केरळचा आहे. त्याचे वडील लोणावळ्यात राहतात, तर तो स्वत: पुण्यात खोली भाड्याने घेऊन राहतो. पहिल्या वर्षी अनुत्तीर्ण झाल्याने तो बुधवारी ‘बॅकलॉग’चा पेपर देत होता. तो 15 मिनिटे उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचला व शिक्षकांची नजर चुकवून मित्राच्या मोबाइलसह वर्गात पोहोचला. आत जाताच त्याने तातडीने प्रश्नपत्रिका घेतली. 

मोबाईलने प्रश्नपत्रिकेचे छायाचित्रे घेऊन ती व्हायरल करुन त्याने मोबाईल बॅगेत ठेवला. दरम्यान, महाविद्यालयाच्या हलगर्जीपणाबद्दल अहवाल आल्यानंतर कारवाईचा निर्णय घेऊ, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली.