Sat, Apr 20, 2019 16:43होमपेज › Pune › गल्ला भरणारे हल्‍लाबोल करतायत : पंकजा मुंडे

गल्ला भरणारे हल्‍लाबोल करतायत : पंकजा मुंडे

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 1:07AMकोंढवा : वार्ताहर

गल्ला भरणारी मंडळी सध्या हल्लाबोल करत आहेत. यांना फक्त नोटांवरील गांधीजी आवडले. स्वच्छता करणारे गांधीजी कधीच आवडले नाहीत. धूरामध्ये आयुष्य संपविणार्‍या महिला यांना कधीच दिसल्या नाहीत. मात्र भाजपने घरोघरी गॅस देण्याचे काम केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची गरिबीशी नाळ जोडली असून, आगामी निवडणुकीत सत्ता प्रस्थापित करण्याची संधी भाजपलाच जनता देणार यात शंका नाही, असे मत ग्रामविकास, महिला बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

प्रभाग क्रमांक 26 काळेबोराटेनगर कौसरबाग येथे महापालिकेच्या माध्यमातून व नगरसेवक संजय घुले यांच्या प्रयत्नातून महंमदवाडी परिसरात लोकनेते गोपीनाथ मुंडे उद्यान व विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, गटनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक दिलीप तुपे, विकास रासकर, सिताराम शरणागत, मंगलदास बांदल, भूषण तुपे, जीवन जाधव, हनुमंत जाधव, संजय सातव, पांडुरंग लव्हाटे आदी उपस्थित होते. यावेळी टिळेकर म्हणाले, या परिसरातीक अनाधिकृत बांधकामे आधिकृत करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सय्यदनगर येथील रेल्वे गेट बायपास करण्यासाठी 46 कोटींचा खर्च दाखविला व भूमीपूजन केले. त्यांची सत्ता गेल्यानंतर अवघ्या 11 कोटी रुपयांच्या खर्चात आम्ही रेल्वे क्रॉसिंग बायपास तयार करणार आहोत. जनतेशी आमची नाळ जोडली आहे.  

गाव गहिवरला...

गरीब लोकांची आस्था असणारे गोपीनाथ मुंडे तासन्तास सर्वसामान्यांच्या अडचणींवर बोलायचे. साहेबांच्या भेटीनेच माझ्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाल्याचे संजय घुले यांनी व्यक्त केले. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्यासह अवघा गाव गहिवरला.