Sun, Jan 20, 2019 16:50



होमपेज › Pune › पंडित उल्हास कशाळकर यांना तानसेन पुरस्कार 

पंडित उल्हास कशाळकर यांना तानसेन पुरस्कार 

Published On: Dec 06 2017 12:06PM | Last Updated: Dec 06 2017 12:06PM

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

भारत सरकारतर्फे संगीत क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे. दोन लाखरुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कशाळकर हे हिंदुस्‍थानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत. त्यांचा जन्म नागपूर येथे पांढरकवडा गावी झाला. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिल नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले. कशाळकरांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताभ्यासास सुरुवात केली. पुढील काळात त्यांना राम मराठ्यांकडून आग्रा घराण्याची आणि गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.