Mon, Apr 22, 2019 16:30होमपेज › Pune › जगद‍्गुरुंच्या पालखी सोहळ्याचे निमगांवात भव्य स्वागत

जगद‍्गुरुंच्या पालखी सोहळ्याचे निमगांवात भव्य स्वागत

Published On: Jul 16 2018 1:22AM | Last Updated: Jul 16 2018 1:07AMनिमगांव केतकी : जावेद मुलाणी

लाखो वैष्णवांसह जगद‍्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (दि. 15) संध्याकाळी महाराष्ट्रात नागवेलीच्या विड्याच्या पानांच्यासाठी  प्रसिद्ध असलेल्या निमगांव केतकीत मुक्कामासाठी विसावला. दरम्यान, गावातील भजनी मंडळासह गावकर्‍यांनी सौदंडीच्या माळावर सोहळ्याचे स्वागत केले.

या वेळी पंचायत समितीचे उपसभापती देवराज जाधव, सरपंच छाया मिसाळ, नरसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चांदणे, संदीप भोंग, तात्यासाहेब वडापुरे, बाबासाहेब भोंग, दीपक भोंग, वसंत घाडगे, किशोर पवार, संजय राऊत, आकाश मिसाळ, सचिन मुलाणी, सोमनाथ मिसाळ, कांतीलाल भोंग, मधुकर यादव, विजय महाजन, गोरख आदलिंग, बाळासाहेब लोणकर  आदी उपस्थित होते. पालखी सोहळा सणसर गावातील मुक्कामाचा पाहुणचार उरकून बारामती-इंदापूर राज्य महामार्गावरुन मार्गस्थ होत तब्बल 22 किलोमीटरचा मोठा टप्पा हरिनामाचा जयघोष करत पार करून अकराव्या मुक्कामाला निमगांव केतकीत विसावला. या वेळी गावात भव्य स्वागत कमानी, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गावातील मारुती महादेव मंदिरासमोर वारकर्‍यांच्या भोजनाची सोय करण्यात आली होती.

गावातील अष्टविनायक ग्रुप, सुवर्णयुग सहकारी पतसंस्था व दशरथ डोंगरे मित्र परिवार, श्रीकृष्ण गणेश मंडळ, श्री गणेश पतसंस्था, गुरुसेवा बचत गट कै. सोपानराव भोंग चॅरिटेबल ट्रस्ट, श्री गणेश पतसंस्था, सुवर्णयुगेश्वर पतसंस्था, जनहित पतसंस्था, इंदापूर तालुका शिक्षक समिती, नरसिंह प्रतिष्ठान, शिक्षकांची इब्टा संघटना, संत सावतामाळी चालक मालक संघटना, जय भवानी महिला पतसंस्था, विकास नवरात्र मंडळ, यशराज हॉटेल, नवी पेठ मित्र मंडळ, संत सेना महाराज मंडळ, श्रीकृष्ण गणेश मंडळ, केतकेश्वर तरुण मंडळ, कुंडलिक कचरे मित्र परिवार, डाळिंब कमिशन एजंट व शिवसेना, शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट, स्वर्गीय विठ्ठल जठार यांच्या स्मरणार्थ, केजीएन ग्रुप, अनंता गटकुळ व आकाश गोटे, संजय राऊत प्रतिष्ठान आदींनी अन्नदानासह अल्पोपहार, चहा, चरण सेवा, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या. पानाचे निमगांव म्हणून ओळख असलेल्या गावातील तसेच जगन्नाथ शेंडे, कांतीलाल शेंडे, गफूरभाई पठाण, राजाराम राऊत, गोरख आदलिंग यांच्यासह अनेक पानमळेधारक शेतकर्‍यांनी नागवेलीची पाने वैष्णव भक्तांना मोफत वाटली.