Tue, Apr 23, 2019 14:22होमपेज › Pune › पुण्यात PMPML च्या धावत्या बसने घेतला पेट (Video)

पुण्यात PMPML च्या धावत्या बसने घेतला पेट (Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे प्रतिनिधी 

पुणे नगर रस्त्यावर इनॉर्बिटमॉल समोर चालत्या पीएमपीएमएलच्या बस ने सकाळी दहाच्या सुमारास अचानक पेट घेतला. बीआरटी मार्गावर अचानक बसने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. मागील काही महिन्यात बसने पेट घेतल्याची ही आठवी घटना आहे.  

दरम्यान अग्नीशमन दलाकडून तात्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. गुरुवारी सकाळी निगडीवरून वाघोलीच्या दिशेने ही पीएमपीएमएल बस जात असताना ही दुर्घटना घडली.  बीआरटी मार्गातून जाताना इनॉर्बिटमॉलसमोर बसने अचानक पेट घेतला. प्रवाशांनी खिडकीतून उड्या टाकून जीव वाचवल्याची माहिती वाहकाकडून समजते. दरम्यान, अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

 

 


  •