Thu, Nov 15, 2018 03:28



होमपेज › Pune › पीएमपी बस पुन्हा पेटली

पीएमपी बस पुन्हा पेटली

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 06 2017 11:24PM

बुकमार्क करा





पिंपरी : प्रतिनिधी 

चिंचवड गावात शहीद अशोक कामटे बस थांब्यावर उभी असलेली पीएमपीएमएल बस आगीत जळून खाक झाली. बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना बुधवारी (दि.7) दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली.

मागील दहा दिवसांमध्ये पीएमपी बसने पेट घेण्याची ही तिसरी घटना होती. या अगोदर दि. 27 नोव्हेंबरला दिवे घाटात बसने पेट घेतला होता, तर दि. 4 डिसेंबर रोजी सिंहगड रोडवर बसने पेट घेतला होता. नेमक्या कुणाच्या चुकीमुळे बस पेट घेत आहेत याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. मार्ग क्रमांक 313 वरील चिंचवड ते चांदखेड-नेहरूनगर डेपोची  एमएच 12 एचबी 401 या क्रमाकांची बस पूर्ण जळून खाक झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन अग्निबंबांनी आग विझवली. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात ली. 

काम संपल्यानंतर चालकाने चिंचवड गावतील शहीद अशोक कामटे बस स्थानकावर बस चालू अवस्थेत उभी केली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आग एवढी मोठी होती की, धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आग कशामुळे लागली होती याचे नेमके कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.