Thu, Jun 27, 2019 11:56होमपेज › Pune › देहूरोडला ‘पीएमपी’चा थरार, ५ जखमी 

देहूरोडला ‘पीएमपी’चा थरार, ५ जखमी 

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 12:24AMदेहूरोड : वार्ताहर

गुरुवारी दुपारी ‘पीएमपी’ बसचा  ब्रेक निकामी झाल्यामुळे ती रस्त्यांवरील वाहनांना धडकली. यात तीन दुचाकीं अक्षरशः चिरडल्या. तर एका इनोव्हा गाडीला पाठीमागून ठोस दिली. यात  पाच जण जखमी झाले. चालकाने प्रसंगावधान राखून नव्या उड्डाणपूलाच्या कठड्याला बस घासली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.  

शाहिद कासीम जुबेरी (वय 24, रा, चिंचवड), स्वप्नील सखाराम कुलकर्णी (वय 35, रा, वारजे ), अक्षय मुकुंदा कांबळे (वय 25, साईनगर, देहूरोड), नारायण मुकुंदा कांबळे (29, साईनगर, देहूरोड),  वीरसिंग श्रवणसिंग शेखावत (24, चिंचवड) अशी जखमींची नावे आहेत. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ‘पीएमपी’ ची बस क्रमांक (एमएच12 इ क्यू 3190) ही निगडीहून वडगावकडे निघाली होती. देहूरोड येथे रेल्वे उड्डाणपूलावरून येत असताना बसचे ब्रेक निकामी झाल्याचा प्रकार चालकाच्या लक्षात आला. या भागात पूलाचे काम सुरू असल्यामुळे तसेच सवाना चौक हा मोठा वर्दळीचा असल्यामुळे नेहमीच वाहनांची रांग असते. ऐन गर्दीच्यावेळी हा प्रकार घडला; मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून पुढील वाहन चालकांना सावधानतेचा इशारा दिला. 

बस वेगात पुढे जात असताना एकच कोलाहल उडाला, त्यात एक बुलेट, स्टार सिटी आणि होंडा करिज्मा, या दुचाकींचा चुराडा झाला. त्यापुढे उभ्या असलेल्या इनोव्हा गाडीलाही बसची जोरदार धडक बसली. चालकाने हुशारी दाखवत बस डाव्या बाजूच्या पूलाच्या भिंतीवर घासली. त्यामुळे बस थांबली. चौकाच्या अलिकडेच बस नियंत्रणात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.