Wed, Nov 21, 2018 13:37होमपेज › Pune › पुणे : तवेरा कार दुचाकीच्या धडकेत एक ठार

पुणे : तवेरा कार दुचाकीच्या धडकेत एक ठार

Published On: May 20 2018 3:51PM | Last Updated: May 20 2018 3:51PMओतूर : वार्ताहर

कल्याण - नगर महामार्गावरील ओतूर (ता.जुन्नर ) गावच्या हद्दीत कोळमाथा येथे तवेरा कार व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सदर अपघात ता.२० मे रोजी पहाटे १ वा.१५ मि. च्या सुमारास झाला.

तवेरा कार ( एम.एच.०५. बी जे. ०७९७) ही मुंबईच्या दिशेने जात असताना समोरून आलेल्या दुचाकी ( एम.एच.१२ जी.एच. ७९९५) ला जोरदार  धडकली या अपघातात नवनाथ ज्योतिराम इरगट ( वय २३ ) रा. ओतूर हा तरुण जागीच ठार झाला. या अपघाताची फिर्याद त्‍याचा भाऊ अमरनाथ इरगट याने ओतूर पोलीस स्टेशनला दिली आहे.

हा अपघात इतका जबरदस्त होता की, मोटारसायकलच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या आहेत. तर तवेराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताबाबतचा पुढील तपास पो.नाईक गोसावी हे करीत आहेत.