Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Pune › सम्यक साहित्य संमेलनाचे जानेवारीत आयोजन

सम्यक साहित्य संमेलनाचे जानेवारीत आयोजन

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 28 2017 12:25AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन  व स्टडीज सेंटर, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे दि. 11 ते 14 जानेवारी दरम्यान ‘अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. 

संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांची निवड झाली आहे. याप्रसंगी  सूर्यनारायण रणसुभे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,  अशी माहिती संमेलनाचे संयोजक परशुराम वाडेकर यांनी  पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी के. इमोक यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होईल.

शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (एसएसपीएम शाळा) येथून दि. 11 जानेवारी रोजी संविधान सन्मान रॅलीद्वारे संमेलनाला सुरवात होईल.दि. 12 जानेवारीला संमेलनात ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाबरोबरच ’मी आणि माझे साहित्य’, ’राजकीय पक्ष आणि दलित राजकारण’ या विषयांवरील परिसंवादासह कवी संमेलन आणि द ग्रेट रिपब्लिकन कार्यकर्ता’ हे नाटक होणार आहे. दि. 13 जानेवारी रोजी सप्तखंजिरी प्रबोधन कार्यक्रमासह ज्येष्ठ लेखक उत्तम कांबळे आणि नजुबाई गावित यांच्या मुलाखती होतील. कवी संमेलनासह समाजस्वास्थ’ हे नाटक होईल. भीमा कोरेगाव संघर्षगाथा, साहित्यिक व इतिहासकारांची भूमिका’, दलित चळवळीची सध्यस्थिती आणि लेखकांची भूमिका’ याविषयांवर परिसंवाद होईल.

दि. 14 जानेवारीला ’तुफानातील दिवे’ या कार्यक्रमासह सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने आणि प्रतिकाराची पर्यायी संरचना’, नामातरांचा लढा आणि मराठी साहित्य’ हे परिसंवाद आयोजित केले आहेत. हे संमेलन बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत होईल.