होमपेज › Pune › कला शिक्षणाकडे तरुणांची डोळेझाक

कला शिक्षणाकडे तरुणांची डोळेझाक

Published On: Dec 30 2017 1:31AM | Last Updated: Dec 29 2017 11:26PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

सध्याचा काळ बदलत आहे. अनेक क्षेत्रात देश प्रगती, विकासाच्या दिशेने आगेकूच करत आहे. विद्यार्थीही तंत्र, विज्ञानाच्या शिक्षणाची कास धरून पुढे जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे परंतु चित्रकला, शिल्पकला यांसारख्या कला शिक्षणाकडे आजची तररुण पिढी डोळे झाक करत असल्याचे दिसत आहे, अशी खंत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केली.

डॉ. मुकुंद राईलकर यांनी तयार केलेल्या देश, विदेशातील नामवंतांच्या लघुशिल्पांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गो. बं. देगलूरकर, मुरलीधर लाहोटी, शिल्पकार विवेक खटावकर, अनुराधा राईलकर, शैलेश गुजर व अन्य उपस्थित होते.

या वेळी रवी परांजपे म्हणाले, लघुशिल्प प्रदर्शनामध्ये शिल्पांची केलेली मांडणी अतिशय सुरेख आहे. शिल्पांमध्ये एक अनोखी भिन्नता दिसत आहे. भारतामध्ये राईलकरांसारखे अनेक थोर कलाकार आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांना सेक्युरिटी काऊन्सिलमध्ये अजूनही जागा नाही.लघुशिल्प प्रदर्शनात राजकीय, सामाजिक, साहित्य, संगीत, क्रीडा यासारख्या क्षेत्रात नावाजलेल्या दिग्गजांची लघशिल्पे या प्रदर्शनात पाहायला मिळाली. हे प्रदर्शन 30 व 31 तारखेपर्यंत आणखी दोन दिवस सुरू असणार आहे.