Sun, Nov 18, 2018 07:12होमपेज › Pune › अधिकारी, अभियंत्यांना घडणार सिंगापूर वारी

अधिकारी, अभियंत्यांना घडणार सिंगापूर वारी

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

सिंगापूर कार्पोरेसन आणि टेमसेक फान्डेशन यांच्यावतीने एप्रिल महिन्यात सिंगापूर येथे दुसर्‍या क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या निमित्ताने महापालिकेतील अधिकारी आणि कनिष्ट अभियंत्यांना सिंगापूरची वारी घडणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. या कार्यशाळेस महा मेट्रो, पीसीएमसी, पीएमआरडीए आणि पिएमपीएमएलचे अधिकारीही जाणार आहेत. या दौर्‍यांचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. यांच्याकडून केला जाणार आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन, पुणे महापालिका, सिंगापूर कॉर्पोरेशन आणि टेमसेक फान्डेशन यांच्या सहकार्याने शहरी व्यवस्थापन या विषयावर यशदा येथे जानेवारीमध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आत्ता दुसर्‍या टप्प्यातील क्षमता बांधणी कार्यशाळेचे एप्रिलमध्ये सिंगापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी महापालिकेतील तीन खाते प्रमुख आणि सात अभियंते जाणार आहेत. प्रकल्प, पथ आणि बांधकाम विभागाचे प्रमुख आणि पथ, प्रकल्प, बांधकाम विभागातील कनिष्ट अभियंत्यांचा समावेश आहे. कनिष्ट अभियंत्यांची निवड करण्यासाठी मूल्यांकनावर आधारीत परीक्षा 12 मार्च रोजी घेण्यात आली. या परीक्षेमध्ये पथ, प्रकल्प, बांधकाम विभागातील 52 कनिष्ट अभियंत्यांनी भाग घेतला. त्यांना मिळालेल्या गुणसंख्येनुसार त्यांपैकी सात कनिष्ट अभियंत्यांची निवड करण्यात आली. 

 

Tags : pune, pune news, pune municipal corporation, Singapore, workshop,