Tue, Jul 23, 2019 06:46होमपेज › Pune › पर्यावरण संरक्षणासाठी ‘निर्मल रक्षा’ अभियानाचे आयोजन

पर्यावरण संरक्षणासाठी ‘निर्मल रक्षा’ अभियानाचे आयोजन

Published On: Aug 05 2018 1:31AM | Last Updated: Aug 05 2018 12:48AMपुणे : प्रतिनिधी 

मासिकपाळीच्या काळात महिलांकडून सॅनिटरी नॅपकिन वापरण्याविषयी जागृती झालेली असली तरी, त्यानंतर त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट न लावल्यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या वाढत आहेत. म्हणूनच सिल्वर एज युटोपियन ऑर्गनायझेशन आणि सनदी अधिकारी ज्ञानेश्‍वर मुळे यांची, पुढचे पाऊल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्मल रक्षा अभियान’ (एनआरए) हाती घेतलेले आहे. या अभियानासाठी महाराष्ट्राकडून सोनिया कोंजेती आणि उत्तर प्रदेशकडून  वर्तिका नंदा व प्रियंका कोठारी यांची विशेष स्वेच्छादूतपदी निवड झाली आहे. 

अभियानाचा  उद्घाटन समारंभ शनिवार, 28 जुलै रोजी  प्रवासी भारतीय केंद्र चाणक्यपुरी, दिल्ली येथे पार पडला. मासिकपाळीविषयी जनजागृती,  नॅपकिन्सचा वापर आणि त्याची विल्हेवाट यात एनआरएची भूमिका महत्त्वाची ठरेल, असा विश्‍वास महिला बालकल्याण विभागाच्या केंद्रीय मंत्री  मनेका गांधी भारत यांनी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला आहे.

महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणार्‍या बारामतीच्या  सुनंदा पवार या वेळी उपस्थित होत्या.  सुमारे 15 हजार  शाळकरी मुली व महिला यांना नॅपकिन्स पुरवतात. या वेळी विविध देशातील राष्ट्रदूत यांची उपस्थिती होती. महिलांच्या आरोग्याची काळजी न घेतल्यास देश प्रगती करू शकणार नाही, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे  यांनी व्यक्त केले. ते म्हणाले शिक्षण व आरोग्य हे दोन्ही मूलभूत अधिकार महिलांना मिळायलाच हवेत त्यामुळे महिलांची प्रगती होणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  ऐश्वर्या वानखडे हिने केले. आदित पुरोहित यांनी आभार प्रदर्शन केले. 

देशाच्या विविध भागातून अभियानासाठी नाशिकच्या प्रीतम आढाव, नागपूरचे प्रवीण निकम, कोल्हापूरच्या रिया पाटील, जळगावच्या वैशाली विसपुते, सातार्‍याच्या दीपा महाडिक आणि बारामतीच्या संगीता काकडे यांची विशेषदूत म्हणून निवड झाली आहे.