Sun, Apr 21, 2019 01:52होमपेज › Pune › हुश्श! नीलायम पूल वाहतुकीसाठी अखेर खुला

हुश्श! नीलायम पूल वाहतुकीसाठी अखेर खुला

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 12:30AMपुणे : प्रतिनिधी

28 जूनपासून बंद करण्यात आलेला नीलायम पूल मंगळवारपासून (दि.3) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. नीलायम पुलावरील वाहतूक बंद केल्यामुळे एस. पी. चौकातून नीलायम पूलमार्गे जाणार्‍या वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा उपयोग करावा लागला. तसेच शाहू कॉलेज चौकातून नीलायम पूलमार्गे जाणार्‍या वाहनचालकांना सावरकर चौकातून दांडेकर पुलावरून मार्गस्थ व्हावे लागले.  पूल बंद कालावधीत दत्तवाडी वाहतूक पोलिसांकडून विविध चौकात ‘मॅन्युअली’ वाहतूक करण्यावर भर दिला जात होता. 

पुलाखालून पाईपलाईन टाकण्याचे काम सलग पाच दिवस सुरू असल्यामुळे सावरकर चौक, जेधे चौक, दांडेकर चौक, सिंहगड रस्त्यावर अतिरिक्त वाहनांचा बोजा पडत होता. परिणामी नीलायम पूलमार्गे शहराच्या विविध भागात जाणार्‍या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत होता. मंगळवारपासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.