Wed, Jul 17, 2019 18:39होमपेज › Pune › येरवडा परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश

येरवडा परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 12:54AMपुणे : प्रतिनिधी 

येरवडा परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून पोलिसांनी दोन उझबेकीस्थानच्या मुलींची सुटका केली. या प्रकरणी विकास ऊर्फ डंबर दलू गिरी (26, रा. गणेशनगर, वडगावशेरी) याला येरवडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक रोहिणी तुकाराम शेवाळे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित, विशाल यांचा पोलिस शोध घेत आहेत. दि. 14 मार्च 2014 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रोहित त्याचा साथीदार विशाल आणि विकास यांनी वेश्याव्यवसाय करण्याच्या दृष्टीने परदेशी मुलींना पुण्यामध्ये आणले. हॉटेल रॉयल ऑर्चिड गोल्डन सूट येथील 801 आणि 901 मध्ये हा प्रकार सुरू असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. येथून दोन परदेशी मुलींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी विकास गिरीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, अनैतिक मानवी वाहतूक व्यापाराशी संंबंधित आहे. 

सुटका करण्यात आलेल्या महिला कोणामार्फत पुण्यात आल्या, जप्‍त करण्यात आलेले मोबाईल कोणाचे आहेत, त्याचा वापर कशा पध्दतीने केला जात होता, फरार असलेल्यांना अटक करायची असल्याने सरकारी वकील वामन कोळी यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.