Mon, Jun 24, 2019 17:35होमपेज › Pune › ‘डीबीटी’ला उरले अवघे 24 तास

‘डीबीटी’ला उरले अवघे 24 तास

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : नवनाथ शिंदे

जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान वितरित करण्यासाठी प्रशासनाच्या हातात अवघे 24 तास शिल्लक राहिले आहेत, तर लाभार्थींना 31 मार्चपूर्वी अनुदानाचे वितरण न झाल्यास हजारो लाभार्थी वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

मार्चच्या पंधरवड्यात बहुतांश विभागातील अंतिम लाभार्थींच्या याद्या उशिरा पंचायत समितीकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाभाथीर्र्ंना निवडीचे पत्र देणे, वस्तूच्या खरेदीची पावती स्वीकारण्यास पंचायत समिती प्रशासनाला उशीर झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकाही पंचायत समितीकडून खरेदीच्या पावत्या जिल्हा परिषदेकडे जमा केल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून एकाही लाभार्थीला अनुदान वितरित करण्यात आले नाही. 

दरम्यान, जिल्ह्यात बहुतांश पंचायत समित्यांकडे लाभार्थींनी बिले जमा केली आहेत. 28 मार्चपर्यंत विविध वस्तूंची खरेदी बिले गटविकास अधिकार्‍यांच्या टेबलावर पडून होती. अनुदानाचे वितरण करण्याचा शुभारंभ न झाल्यामुळे अवघ्या 24 तासांत जिल्हा परिषद प्रशासनावर अतिरिक्त ताण वाढला आहे. विविध योजनांचा निधी एकच वर्षामध्ये वापरावा लागतो. त्यामुळे अनुदान वितरित न झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न लाभार्थींनी विचारला आहे. 

एखाद्या लाभार्थीच्या खात्याबद्दल तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास संपूर्ण लाभाथीर्र्ंच्या यादीची फेरतपासणी प्रशासनाला करावी लागणार आहे. त्यामुळे बहुतांश लाभार्थींना अनुदान वेळेत न मिळाल्यास जिल्हा परिषद ठराव करून अनुदान वाटपाची मुदत वाढविणार का, असा प्रश्‍न आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने 716 लाभार्थीर्ंंना पीठगिरणीचे, तर 966 लाभार्थींना शिलाई मशिनचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. समाजकल्याणाच्या, कोंबडी खुराड्यासाठी 25र्0, पिकोफॉल मशिन 556, पीठगिरणी 741, ताडपत्री 806, शेळी-मेंढी 116, ग्रंथालय पुस्तके व फर्निचर 169, व्यायामशाळा साहित्य 147, भजनी साहित्य 303, हायमास्ट दिवे 120, यशवंत घरकुल 436 असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.पशुसंवर्धनमध्ये पशुपालकांना गव्हाण व जाळी पुरवठा 203, मैत्रीण योजना 75 टक्के अनुदानावर पाच शेळ्यांचा पुरवठा करण्यासाठी 292, मिल्किंग मशिनसाठी 86, कडबाकुट्टीसाठी 249, कडकनाथ कुक्कट पक्ष्यांसाठी 576 लाभार्थी निश्‍चित करण्यात आले आहेत; कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या बोअरवेल मोटार नग, पी.व्ही.सी. पाईप, सायकल कोळपे, कडबाकुट्टी अशा विविध योजनांसाठी तब्बल 7 हजार 384 लाभार्थीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

Tags : Pune, Pune News, Only, 24 hours, DBT 


  •