Wed, Apr 24, 2019 16:34होमपेज › Pune › अकरा महिन्यांत ३८११ पुणेकरांना गंडा

उत्तर प्रदेश, नायजेरियन भामट्यांकडून ऑनलाईन फसवणूक

Published On: Dec 30 2017 1:31AM | Last Updated: Dec 29 2017 11:05PM

बुकमार्क करा
पुणे : पुष्कराज दांडेकर 

मोबाईलवर एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती घेऊन, कार्डचे क्लोनिंग करून, कर्ज, नोकरी, व्यवसाय देण्याच्या आमिषाने, तसेच लग्नाच्या आमिषाने मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 3811 पुणेकरांना सायबर भामट्यांनी कोट्यवधींचा गंडा घातल्याची धक्कादायक स्थिती सध्या पुण्यात आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणांमध्ये आतापर्यंत फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास करून 70 लाख 254 रुपयांचा रिफंड पुणेकरांना दिला आहे. पुढील वेगवेगळ्या मार्गांनी पुणेकरांना गंडा घातला जातोय... 

कार्डची माहिती घेऊन, क्लोनिंग करून फसवणूक पुणे देशातील मेट्रो सिटींपैकी एक आहे. शहरात आता प्रत्येकाकडेच एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड आहे. पुणेकरच नव्हे तर देशभरातील नागरिकांना एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करत आहेत. स्मार्टफोनमुळे सर्व व्यवहार सुकर झाले आहेत. मात्र खातेदाराला फोन येतो. समोरील व्यक्ती बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगूून कार्ड ब्लॉक होण्याची भीती दाखवतो अन कार्डची गोपनीय माहिती विचारून घेतो. अन क्षणार्धात खात्यातील पैसे गायब होतात. तसेच कार्डची क्लोनिंग करून बनावट कार्ड तयार करूनही रोकड गायब केली जाते. 

नोकरी, विमा, कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष फोन करून कमी व्याजदराने कर्ज देण्याचे किंवा नोकरी लावण्याचे आमिष दाखवले जाते. मात्र फोन करणारा भामटा कर्ज मंजूर करण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी पैशांची मागणी करतो. गरजू व्यक्ती कर्ज मिळविण्यासाठी ऑनलाईन रक्कम पाठवतो. त्यानंतर कर्जही मिळत नाही किंवा नोकरी मिळत नाही. बेरोजगार तरुण लवकर नोकरी मिण्याच्या किंवा व्यवसायासाठी कर्ज मिळण्याच्या आशेने बळी पडतात. 

तर विमा किंवा त्याची रक्कम देण्याच्या आमिषानेही पुणेकरांना जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक केली जाते. तर त्यासोबतच व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा भागीदार करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते.