Sun, Mar 24, 2019 08:58होमपेज › Pune › परदेशात शिकणार्‍यांना एकदाच अर्थसहाय्य

परदेशात शिकणार्‍यांना एकदाच अर्थसहाय्य

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 26 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी 

परदेशात उच्च शिक्षण घेणार्‍या मागास प्रवर्गातील आणि आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना महापालिकेकडून त्या-त्या आर्थिक वर्षात अर्थसहाय्य केले जाते. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये एकदाच देण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. स्थायीने मान्यता दिल्यानंतर या विद्यार्थ्यांना हे अर्थसहाय्य एकरकमी मिळणार आहे. 

वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकीय, व्यवस्थापन, विधि, वाणिज्य यासारख्या उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी परदेशात प्रवेश घेतात. अर्थसहाय्यासाठी अर्ज आलेल्या विद्यार्थ्यांची निवड महापौर, सर्व पक्षनेते, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, मुख्य समाजविकास अधिकारी यांच्या समितीमार्फत केली जाते. 

‘आरटीजीएस’द्वारे या विद्यार्थ्यांच्या खात्यात दोन लाख रुपये एकदाच जमा करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव दिला आहे. यावर स्थायीच्या 31 जानेवारी रोजी होणार्‍या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.