Mon, Jun 17, 2019 14:14होमपेज › Pune › अपघाताच्या वादातून एकाचा निर्घृण खून

अपघाताच्या वादातून एकाचा निर्घृण खून

Published On: Jun 01 2018 2:12AM | Last Updated: Jun 01 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी

टँव्हल्स आणि आयसर ट्रक यांच्यात ओव्हरेट करताना अपघातानंतर झालेल्या वादातून दोघांनी ट्रक चालकाचा बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील जांभुळवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. 

लालजी बंधू पाल (रा. महात्मा फुलेनगर, आरे कॉलनी रोड, मुंबई) असे खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात असलम इकबाल मुल्ला (वय 23, रा. तांबेमळा इचलकरंजी ता. हातकंगले जि. कोल्हापूर) आणि अमोल मधुकर गाडेकर (वय 32, रा. मु.पो.वरणे ता.जि.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इब्राहीम हुसेन सय्यद (वय 60, धंदा सेवक नगर जरीमरी कुल अंधेरी रोड साकीनाका मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असलम मुल्ला हा बुधवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास वैभव ट्रॅव्हल्सची खासगी बस ( क्रमांक. एम.एच-09-सी.व्ही 918) ही कोल्हापूरवरून मुंबईकडे घेऊन निघाला होता. तर, अमोल गाडेकर हा पर्यायी चालक आहे.

तोही असलमसोबत गाडीत होता. तर, मयत लालजी हा त्याची आयसर ट्रक (एम.एच. 04. जी.आर.8021) घेऊन बंगळुरूवरून मुंबईला निघाला होता. फिर्यादी यांचा हा ट्रक असून, तेही दुसर्‍या ट्रकमधून पाठिमागून मुंबईला निघाले होते. दरम्यान जांभळवाडी येथील दरी पुलाजवळील ऑस्कर पेव्हर्स येथे मयत लालजी याने त्याचा ट्रक ट्रॉव्हल्सला ओव्हरेटककरून पुढे निघाला होता. त्यावेळी त्याच्या ट्रकचा पाठिमागील भाग ट्रॉव्हलला पुढील भागाला धडकून साईड ग्लास तुटला. तसेच, ट्रॅव्हल्सचे नुकसान झाले. त्यानंतर असलम मुल्ला व अमोल गाडेकर यांनी आयसर ट्रक थांबवला.

लालजी पाल याला खाली ओडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. या वादातून दोघांनी लालजी याला बेदम मारहाण केली. यात लालजी गंभीर जखमी झाला. त्यानंतर दोघेही तेथून पसार झाले. नागरिकांनी तसेच फिर्यादींनी लालजी याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा दुपारी मृत्यू झाला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला.