Wed, Mar 20, 2019 22:56होमपेज › Pune › टायर फुटल्याने अपघातात पुण्याचा एक ठार, ७ जखमी

टायर फुटल्याने अपघातात पुण्याचा एक ठार, ७ जखमी

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 12:49AMसारोळा : वार्ताहर 

पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री (ता. भोर) येथे शनिवारी सायंकाळी इनोव्हा गाडीचा पुढील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर 7 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नसरापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इंडस्ट्रियल ट्रेडिंग कंपनी भोसरी, येथील 40 जण सहलीसाठी महाबळेश्वर येथे गेले होते. त्यापैकी इनोव्हातून (एमएच 14 /डीए 9960) आठ जण पुण्याकडे येत असताना महामार्गावर हरिश्चंद्रीच्या हद्दीत इनोव्हाचा टायर फुटला. गाडी सातार्‍याच्या दिशेला ट्रकला धडकून पुन्हा पुण्याच्या दिशेला आली. अपघातानंतर इनोव्हाच्या एअर बॅग्ज उघडून फुटल्या.

त्यावेळी अभिनेता सिध्दांत चांदेकर यांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यास मदत केली. जागेवर ठार झालेल्याचे नाव सर्वोत्तम देविदास जोशी (62, कर्वे रोड, पुणे)  असे आहे.  प्रसाद चंद्रकांत गुजर (गंगाधाम चौक, मार्केड यार्ड), किशोर मेघराज धूत (60, बावधन), श्‍वेेता अशिष धूत (34), कविता अशिष धूत (30), बाबुराव बलदीराम बिशतोही (43, पाषाण), अशोक गौर (23, बावधन) व  विनायक दीक्षित (40, पाषाण) हे जखमी आहेत. राजगडचे निरीक्षक सुनील गोडसे, हवालदार अनिता रवळेकर तपास करीत आहेत.