Wed, Jul 24, 2019 12:07होमपेज › Pune › पुणे : शिंदवणे घाटात टँकर कोसळून एक ठार   

पुणे : शिंदवणे घाटात टँकर कोसळून एक ठार   

Published On: Aug 03 2018 2:05PM | Last Updated: Aug 03 2018 1:58PMउरुळी कांचन : वार्ताहर

शिंदवणे घाटमार्गे मोकळ्या इंधन मालवाहू टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर पंचवीस फूट खोल घाटमाथ्यांवरून पलटी होवून  खाली कोसळला. या झालेल्या अपघातात चालक टँकरखाली सापडून जागीच ठार झाला. ही घटना शिंदवणे (ता.हवेली ) घाटात शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

दिनेश दत्तोबा बिराजदार (वय ३९, रा. लातूर, मोरेनगर ) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. मालवाहू टँकर शिंदवणे घाटातून उरुळी कांचन दिशेने प्रवास करीत होता. घाटातील पहिल्याच वळणावर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर पलटी होवून पंचवीस फूट घाटमाथ्यावरून खाली कोसळला.

 टँकर कोसळताना चालकाने प्रसंगावधान दाखवत खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतू चालक टँकरखाली आल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेचा  तपास पोलिस हवालदार सचिन पवार करत आहेत.