Sat, Jul 20, 2019 13:20होमपेज › Pune › राठी टेक सर्व्हिसेस प्रा. लि.-योगा डू, चिरंजीव फाउंडेशन पुणे व ‘दैनिक पुढारी’चा उपक्रम 

योगाथॉनमध्ये घातले एक लाख सूर्यनमस्कार

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 24 2018 12:49AMपुणे : प्रतिनिधी 

भारतीय प्राचीन संस्कृती व ग्रंथपरंपरेनुसार योग व योगशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक अशा सर्व स्तरांवर योग मानवाला स्थैर्य प्राप्त करून निरोगी आयुष्य जगण्यास मदत करतो. योगशास्त्राचा प्रचार सर्व स्तरात व्हावा तसेच 10 वी व 12वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक शिक्षणाबरोबर योगशिक्षण घेतल्यास त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. हाच दृष्टिकोन समोर ठेवून चिरंजीव फाउंडेशन ही पुण्यातील संस्था योग विद्यापीठाशी संलग्न राहून योगक्षेत्रात कार्यरत आहे. योगदिनानिमित्ताने राठी टेक सर्व्हिसेस प्रा. लि.- योगा डू, चिरंजीव फाउंडेशन पुणे व दैनिक पुढारी यांनी एकत्रितपणे योगा सप्ताहाचे- योगाथॅान-सूर्यनमस्कार आवाहन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 15 जून ते 21 जून यादरम्यान हा कार्यक्रम पार पडला. 

या कार्यक्रमास सर्वच स्तरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था व रुग्णालये, व्यावसायिक संस्था, आय टी सर्व्हिसेस आदींचा या सप्ताहात सहभाग होता. योगाथॉन एक सूर्यनमस्कार आवाहनाची सुरुवात एस हॉस्पिटलपासून करण्यात आली. याप्रसंगी डॉ. सुरेश पाटणकर व चिंरजीव फाउंडेशनच्या डॉ. सुनंदा राठी व टिमने या योग सप्ताहाचा शुभारंभ केला व हॉस्पिटलच्या 23 कर्मचारी वर्गाने मिळून 276 सूर्यनमस्कार घातले. या योगाभ्यासात शिथिलिकरण, व्यायाम, सूर्यनमस्कार व रिलॅक्सेशन या तंत्राचा उपयोग करण्यात आला. इर्सेस इन्फोटेक प्रा. लि. पुणे व चिरंजीव अ‍ॅनिमेशन प्रा.ली. पुणे ह्या आयटी क्षेत्रातील कर्मचारी वर्गासाठी या योगाथॉन एक सूर्यनमस्कार आवाहन आयोजित केले होते. व्यवसायजन्य व्याधींना लक्षात ठेवून डेस्क योग या कार्यालयीन योगाचा अभ्यास करवून घेतला. एकूण 18 उपस्थितांनी 1181 सूर्यनमस्कार घातले. याप्रसंगी सर्वात अधिक सूर्यनमस्कार करणार्‍यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. यावेळी इर्सेस इन्फोटेक प्रा.लि. चे संचालक श्री दर्शन सोनार व चिरंजिव अ‍ॅनिमेशन प्रा. लि. चे संचालक श्री आशिष राठी यांना प्रमाणपत्र देण्यात आले. 

अरिना अ‍ॅनिमेशन, टिळक रोड या अ‍ॅनिमेशन व संगणक क्षेत्रातील संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी हा योग अभ्यास आयोजित केला होता. यात 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यर्थ्यांनी एकत्रितपणे 10469 सूर्यनमस्कार घातले. सर्वात जास्त सूर्य नमस्कार घालणार्‍या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख रेणू परमार यांना प्रमाणपत्र देण्यात आले. क्रिटीएटिव्ह क्षेत्रातील प्रगतीपूरक रचनात्मक तंत्राचा योगाभ्यास यावेळी करण्यात आला.  

महेश विद्यालय कोथरूड मराठी व इंग्रजी माध्यम, महेश बालभवन यातील 1200 विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी व जवळपास 50 शिक्षकांनी या योगअभ्यासात भाग घेतला. त्याचप्रमाणे यामध्ये संस्थेचे वर्तमान अध्यक्ष अतुल लाहोटी, शाळेचेमाजी अध्यक्ष डॉ. सुरेंद्र राठी, शाळेच्या मुख्याध्यपिका व पालक वर्ग यांच्या उपस्थितीत हा योगअभ्यास अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात झाला. यावेळी एकुण 45000 हजार सुर्य नमस्कार घलण्यात आले. 

पुर्णाथा  इनव्हेस्टेमेंट अ‍ॅडव्हार्झस प्रा.लि. पुणे या आर्थिक गुंतवणूक सल्लागार क्षेत्रतील नामवंत कंपनीसाठीही योगोथॅान एक सूर्यनमस्कार आवाहान कार्यक्रम घेण्यात आला. तेथील कर्मचार्‍यांनी 150 सूर्यनमस्कार घातले. 

योग दिनानिमित्ताने आयोजित योगाथॅान एक सूर्य नमस्कार आवाहन हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहाने झाला. कर्मचारी, विद्यार्थी, स्वमग्न विद्यार्थी तसेच सर्व सामाजात योगाचा प्रसार व त्याचा शास्त्रोक्त उपचार पद्धती म्हणून स्विकार केला जावा यावर भर देण्यात आला. शारिरिक प्रात्यक्षिके तसेच त्यांचे शास्त्रोक्त व वैज्ञानिक आधार देखील पटवून देण्यात आले. या संपूर्ण योगाथॅान सप्ताहात 1 लाख सूर्य नमस्कार पुर्ण करण्यात आले व हा योग सप्ताह यशस्वी करण्यात राठी टेक, योगा डूचे कर्मचारी, चिरंजीव फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सुनंदा राठी, दैनिक पुढारीच्या मधुरा दाते तसेच योगाथॅानच्या तांत्रीक प्रमुख डॉ. रुचिरा जोशी यांचा मोलाचा वाटा होता. या संपुर्ण योगाथॅानची संकल्पना व समन्वय म्हणून चिरंजीव फाउंडेशनचे आशिष राठी यांनी कार्यभाग सांभाळला.