Mon, May 20, 2019 20:06होमपेज › Pune › फायनान्स कंपनीला एक कोटीचा गंडा

फायनान्स कंपनीला एक कोटीचा गंडा

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:36AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

व्हॉल्वो कारसाठी फायनान्स कंपनीकडून दोन कोटी 15 लाखांचे कर्ज घेऊन त्यातील 1 कोटी 14 लाखांची परत फेड न करता कंपनीची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी सुधाकर यादव (वय 41, रा. सावरकरनगर, ठाणे वेस्ट) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पुनीत वादवाणी (रा. डी-48, वसंत विहार फुलबागजवळ, ग्वालियर) आणि राकेश राजपाल (इंदोर) यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यादव हे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. त्यांच्या कंपनीचे मुंबईत मुख्य कार्यालय आहे. दरम्यान, यातील आरोपी पुनीत वादवाणी आणि राकेश राजपाल यांचे साई साक्षी अ‍ॅटोमोटिव्ह कार्स प्रायव्हेट लिमिटेड सेंटर आहे. त्यांनी फिर्यादी यांच्या फायनान्स कंपनीकडून मे 2015 मध्ये आठ व्हॉल्वो कार घेण्यासाठी 2 कोटी 15 लाख रुपये कर्ज घेतले.

त्यानंतर यातील कर्जाची काही रक्‍कम भरली. मात्र, उरलेली 1 कोटी 14 लाख 51 हजार रुपये भरले नाहीत. तसेच, घेतलेल्या आठ व्हॉल्वो कार फायनान्सकडे तारण असताना यातील एक कार इंदोर येथील आरटीओकडे रजिस्ट्रेशन केले. तर, इतर वोल्वो कारची परस्पर विल्हेवाट लावून फायनान्स कंपनीची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास विमानतळ पोलिस करत आहेत.