Wed, May 22, 2019 10:27होमपेज › Pune › विनयभंगप्रकरणी एकाला अटक

विनयभंगप्रकरणी एकाला अटक

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 12:43AMपिंपरी : निगडी येथे राहणार्‍या 15 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याबाबत पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. निगडी पोलिसांनी आरोपीला पकडून पोलिस कोठडीत डांबले. अभिजित बाळासाहेब नायभल असे अटक  केलेल्याचे नाव आहे. पीडित तरुणी चिखलीतील भाजी मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी जात  होती.  त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आला माझे तुझ्यावर प्रेम असून, तू मला भेटत जा, असे म्हणून तिचा हात पकडला. तरुणीने आरोपीला विरोध केला; तसेच माझा पाठलाग करू नकोस, असे बजावून सांगितले. त्यानंतर आरोपीने तरुणीला हा प्रकार कोणाला सांगितला, तर जिवे मारण्याची धमकी दिली.