Tue, Sep 25, 2018 08:52होमपेज › Pune › इन्स्टाग्रामवर महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा

इन्स्टाग्रामवर महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:12AMपुणे : प्रतिनिधी

इन्स्टाग्रामवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व फोटो अपलोड करून बदनामी केल्याप्रकरणी आल इंडीया मीम हे खाचे  चालवणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया आठवले गटाच्या पुणे शहर युवती अध्यक्षा प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. प्रियदर्शनी निकाळजे या रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया आठवले गटाच्या शहर युवती अध्यक्षा आहेत. इन्स्टाग्रामवर आल इंडीया मीम या खात्यावरून अज्ञात व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट व बीभत्स फोटो अपलोड केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी याबाबत यापूर्वी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानंतर पुन्हा 22 फेब्रुवारी रोजी त्यांना अशा प्रकारचा बदनामीकारक मजकूर दिसून आला. असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.