Tue, Sep 25, 2018 00:49होमपेज › Pune › ओमप्रकाश गोयंकांना पुणे पोलिसांकडून अटक

ओमप्रकाश गोयंकांना पुणे पोलिसांकडून अटक

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 1:18AMपुणे : प्रतिनिधी

रॉयल ट्विंकल स्टार क्‍लब लिमिटेड व सिट्रस चेक इन्स लिमिटेड कंपनीच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य संचालक ओमप्रकाश गोयंका यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 19 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.  या प्रकरणात 3 हजार 135 गुंतवणूकदारांची 41 कोटी 3 लाख 20 हजार 968 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय विश्‍वनाथ पटवर्धन यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार रॉयल ट्विंकल स्टार क्‍लब लिमिटेड व सिट्रस चेक इन्स लिमिटेड वडाळा मुंबई या कंपनीच्या संचालक ओमप्रकाश वसंतलाल गोयंका (68, मुंबई), प्रकाश गणपत उत्तरेकर (मुंबई), नटराजन व्यंकटरामन (अय्यर) ऊर्फ व्ही. नटराजन (वडाळा, मुंबई), एल. एस. कोटणीस (सायन पूर्व, मुंबई) यांच्याविरोधात  गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे 19 लाख 24 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आली होती.

त्याबरोबरच नाशिक येथील लासलगाव पोलिस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा मुंबई व अहमदनगर येथेही गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडे आलेल्या 3 हजार 135 जणांची 41 कोटी 3 लाख 20 हजार 968 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी व कंपनीचे संस्थापकीय संचालक ओमप्रकाश वसंतलाल गोयंका यांना नाशिक कारागृह येथून तपासासाठी अटक केली. त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने 19 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.