होमपेज › Pune › जुन्या वाहनांना जीपीएस सक्ती नाही

जुन्या वाहनांना जीपीएस सक्ती नाही

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 1:21AMपुणे : प्रतिनिधी

देशातील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा (जीपीएस) व आपत्कालीन बटन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान दि. 1 एप्रिल 2018 नंतर बाजारात विक्रीसाठी येणार्‍या वाहनांमध्ये जीपीएस आणि आपत्कालीन बटन असणे बंधनकारक आहे. दि. 1 एप्रिलपूर्वी उत्पादित, विक्री व नोंदणी आणि खरेदी झालेल्या वाहनांमध्ये ही उपकरणे बसविण्याची सक्ती नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली आहे.

शासनाच्या निर्णयानुसार, केंद्रीय मोटार वाहन नियमामध्ये बदल करून प्रवासी वाहनांना जीपीएस यंत्रणा व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार नुकत्याच वाहनांची खरेदी केलेल्या ग्राहकांमध्ये जीपीएस आणि आपत्कालीन बटण बसविण्यासंदर्भात द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. मात्र, दि. 31 मार्च 2018 पूर्वी तयार झालेल्या वाहनांमध्ये जीपीएस व आपत्कालीन यंत्रणा असणे गरजेचे नाही, असे स्पष्टीकरण आरटीओकडून देण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. निर्णयातून दुचाकी, रिक्षा वाहने वगळण्यात आली आहेत.

 

Tags : pune, pune news, vehicle, GPS,