Thu, Jun 20, 2019 00:31होमपेज › Pune › चिंचवडमध्ये वृद्ध आईवर मुलाचा चाकू हल्ला

चिंचवडमध्ये वृद्ध आईवर मुलाचा चाकू हल्ला

Published On: Apr 29 2018 11:03PM | Last Updated: Apr 29 2018 11:03PMपिंपरी : प्रतिनिधी 

वडील कामानिमित्त बाहेर गेले असल्याने घरात एकट्या असलेल्या ७५ वर्षीय आईवर मुलाने चाकू हल्ला केला. यामध्ये आईच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईवर हल्ला करणारा मुलगा मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरातशनिवारी (दि.२८) दुपारी दोनच्या सुमारास घडला.

सुमन विजय सावंत (७५, रा.चिंचवड) असे जखमी आईचे नाव आहे तर भूपेंद्र विजय सावंत (३५) असे हल्ला करणार्‍या मुलाचे नाव असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण रुग्णालय चौकीतील पोलिसांनी दिली. भूपेंद्र हा मनोरुग्ण असून आई व वडिलांसोबत वाल्हेकरवाडी येथे राहतो. शनिवारी भूपेंद्रचे वडील कामानिमित्त मुंबईला गेले होते. दुपारी भूपेंद्र व त्याची आई दोघेच घरी होते. त्यावेळी भूपेंद्र याने आईच्या दोन्ही डोळ्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये सुमन सावंत गंभीर जखमी झाल्या.