Thu, Jul 18, 2019 00:22होमपेज › Pune › वयोमान झालेल्या बसेस रस्त्यावरवयोमान झालेल्या बसेस रस्त्यावर

वयोमान झालेल्या बसेस रस्त्यावर

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:30AMपुणे : प्रतिनिधी 

पीएमपीच्या ताफ्यात मागील काही वर्षापासून  नवीन बस दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे निम्म्याहून अधिक बसेस नऊ वर्षापासून विविध मार्गावर धावत असून, त्या सध्या जर्जर झाल्या आहेत. बसच्या  देखभाल आणि दुरूस्ती योग्य प्रमाणे होत नसल्याने बस क्षमतेनुसार धावत नसल्याची भर त्यात पडत चालली आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने  लवकरात लवकर आवश्यक  बसखरेदी न केल्यास पुढील काळात  ‘पीएमपी’चा डोलारा कोसळण्याची शक्यता आहे.  

शहर आणि पिंपरी चिंचवड भागात रोज किमान दहा लाखांहून अधिक प्रवाशी पीएमपीच्या बसने प्रवास करीत असतात. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार  सध्या पीएमपीच्या मालकीच्या सुमारे 1349 बस कागदोपत्री अस्तित्वात आहेत.त्यापैकी प्रत्यक्षात या बसेसपैकी केवळ  हजार ते अकराशे बसच मार्गावर धावत आहेत. सन  2000 सालापासून ताफ्यात  बसेस  असून मागील महिनाभरात 61 बस दाखल झाल्या आहेत. 

‘पीएमपी’ संचालक मंडळाने मागील  वर्षांपुर्वी बसेसचे वयोमान 12 वर्षांचे निश्चित होते. किंवा  8 लाख 40 हजार किलोमीटर बस धावल्यानंतर त्यांना मार्गावर न आणण्याचा निर्णय होता. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही. बसेस बारा वर्ष मार्गावर धावल्याने त्या अगदीच जर्जर झालेल्या सुमारे  250 बसेसपैकी काही बस अजूनही रस्त्यावर धावत आहेत. प्रशासनाने या बसेस भंगारात काढण्याची तयारी केली आहे. मात्र  नवीन बसेस मिळत नसल्यामुळे त्याचा वापर सुरूच आहे. त्यामुळे ‘पीएमपी’कडून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून सेवा दिली जात असल्याचा टीका वारंवार होत आहे.

पीएमपीच्या ताफ्यात सध्या सन 2000 नंतरच्या बस असून 11 बस त्यावर्षीच्या आहेत. या बस कागदोपत्री ताफ्यात दाखविण्यात येत असल्या तरी त्या भंगारात काढण्यात आल्या आहेत. तसेच बारा वर्ष व त्यापुढील बसेसची संख्या 250 आहेत. दहा वर्षापुढील बसेसची संख्या सुमारे 563 एवढी आहे. तर 9 वर्ष रस्त्यावर धावलेल्या बस 194 आहेत. त्यामुळे 9 वर्ष व त्यापुढील बसेसची संख्या सुमारे  757 म्हणजे म्हणजेच  मालकीच्या बसेसच्या 56 टक्के एवढ्या बसेस जुन्या आहेत. 

Tags : Pune, Old, buses, streets