Tue, Jul 23, 2019 16:40होमपेज › Pune › कार्यालयातील सहकारी महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

कार्यालयातील सहकारी महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

Published On: Apr 25 2018 3:59PM | Last Updated: Apr 25 2018 3:59PMपिंपरी : प्रतिनिधी

पुणे येथील बांधकाम उपविभागीय कार्यालयात काम करत असताना सहकारी महिलेकडून होणार्‍या त्रासाला कंटाळुन कनिष्ठ लिपिकाने आत्महत्या केल्याची तक्रार लिपिकाच्या पत्नीने चिंचवड पोलिसांकडे केली आहे. हा प्रकार २२ मार्च २०१८ रोजी सकाळी दहा वाजता वाल्हेकरवाडी येथे घडला होता.

अशोक रमेश कांबळे (वय२४, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. तर बांधकाम उपविभागीय कार्यालय पुणे येथील एका ४४ वर्षीय महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अमृता कांबळे हिने फिर्याद दिलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक कांबळे हे बांधकाम उपविभागीय कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून २०१५ पासून कामास होते. या ठिकाणी काम करत असताना सहकारी महिला नेहमीच तिचे काम अशोक कांबळे यांना करण्यास सांगत होती. तसेच कामात काही चुका झाल्यास कार्यालयातील इतर सर्व कर्मचार्‍यांसमोर कांबळे यांना घालुन पाडून वोलत असे. त्यांचा अपमान करून वेळोवेळी मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळुन कांबळे यांनी राहत्‍या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्‍यावरून चिंचवड पोलिसांकडून तपास सुरू आहे.